आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्वारूढ पुतळा:पागीरवाडीत बसवला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून विधिवत स्थापना करण्यात आली

जामखेड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील पागीरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पुतळा बसवला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून विधिवत स्थापना करण्यात आली.

यावेळी आमदार नारायण कुचे, जितेंद्र पालकर, पंचायत समितीचे सदस्य भगवान भोजने, सरपंच प्रदिप पवार, परमेश्वर लेभे, कैलास घायाळ, सचिन जाधव, अण्णासाहेब पैठणे आदी उपस्थित होते.

या स्मारक उभारणीसाठी सरपंच प्रदिप पवार यांनी पुढाकार घेतला. यासाठी उपसरपंच साहेबराव पागिरे, कल्याण पागिरे, गुलाब पागिरे, रूस्तुम पागिरे, अंकुश जामदरे, मंजीत जामदरे, अशोक शेवाळे आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...