आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा; गडकरी यांच्याकडे मागणी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी ब्रह्म महाशिखर परिषदेचे अध्यक्ष सुरेश मुळे व सखाराम कुलकर्णी यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन केली. ब्राह्मण समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

आर्थिक बाजू कमकुवत असल्याने ब्राह्मण समाजाच्या मुला-मुलींना शिक्षण घेता येत नाही. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्यास महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून पुढे शिक्षण घेता येईल व विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल.पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रीय कमिटी बहुभाषीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...