आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:मंठा शहरात मसापची शाखा स्थापन ; शाखाध्यक्षपदी डॉ. सदाशिव कमळकर

मंठा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा येथे मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा स्थापन करण्यात आली असून नुकतेच या शाखेच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांची तर सचिव म्हणून प्रा.प्रदीप देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून शहरात आणि तालुक्यात साहित्य विषयक चळवळींना गती देण्यासाठी आणि उदयोन्मुख उमद्या साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम साहित्य परिषदेच्या माध्यमातून केले जाईल असे नवनियुक्त अध्यक्ष डॉ.सदाशिव कमळकर यांनी सांगितले.

मराठवाडा साहित्य परिषदेची उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, कोषाध्यक्ष महेश भांगडिया, सहसचिव एस. पी. राठोड, सल्लागार सदस्य म्हणून आसाराम बोराडे, प्राचार्य डॉ.भारत खंदारे, प्राचार्य सचिन राठोड, प्रा. संभाजी तिडके, प्रा.सोनाजी कमिटे, अजय अवचार यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून आर. के. राठोड, ज्ञानेश्वर बुलबुले, अनिल पांडे, विष्णू जाधव, सुधाकर शिंदे, डॉ. कपील कमळकर, अशोक मुळे, प्रा. दीपक कुलकर्णी, एकनाथ काकडे, अंबादास गायकवाड, सोमनाथ कमळकर, काशिनाथ गोंडगे, प्रदीप ईक्कर, छत्रगुण तळेकर, राजीव हजारे, अनुराधा हजारे, सुजाता शिंदे यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...