आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडीतून काढली मिरवणूक:जळगाव सपकाळ गावात  स्वराज्य संघटना शाखा स्थापन

जळगाव सपकाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे स्वराज्य संघटनेच्या शाखा स्थापन करुन छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. छत्रपती संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांपर्यंत संभाजी राजांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराजांच्याहस्ते शिवस्मारकाचे पूजन करण्यात आले. शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात हरिनामा गजर, श्री शिवछत्रपती महाराजांचा जयघोषाने परिसर दणाणला. यावेळी शाखाप्रमुख रामेश्वर दौड, उपशाखाप्रमुख कृष्णा सपकाळ, सचिव पंजाब सपकाळ, सहसचिव संतोष सपकाळ, मार्गदर्शक संजय काळे, कायस्थ, तालुका निमंत्रक गोकुळ सपकाळ, अमोल सपकाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...