आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थापना:परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकरी, कामगारांच्या हातात तलवारी देऊन सुराज्य निर्माण केले आहे. आता महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना केली असून स्वराज्य संघटना राज्याचा विकास व रक्षणासाठी काम करणार असून ही संघटना सर्वसामान्यांची ताकद बनेल, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी भोकरदन येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत भोकरदन तालुक्यातील पिंप्री, मालखेडा, जळगाव सपकाळ, सुभानपूर, सिल्लोड रोड, भोकरदन, आन्वा, जळगाव सपकाळ, आडगाव भोंबे, करजगाव, हिसोडा, रेणुकाई पिंपळगाव रेणुकाई, दानापूर, बरंजळा लोखंडे यावरील गावात बैलगाडीसह त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. स्वराज्य संघटनेच्या १४ शाखांचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी छत्रपती संभाजीराजे यांनी संघटनेची भूमिका व वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ही संघटना अन्याय, अत्याचाराविरोधात लढणारी संघटना आहे.

सहकार, शेतकरी, कामगार, आरोग्य, शिक्षण या पंचसूत्रीवर संघटना काम करणार असून संघटनेकडून चुकीला माफी असणार नाही. सर्वसामान्य हे आमची ताकद असणार आहेत. या वेळी जिल्हा निमंत्रक अप्पासाहेब कुढेकर, करण गायकर, गंगाधर काळकुटे, स्वराज्य संघटनेचे तालुका नियंत्रक विकास जाधव, गोकुळ सपकाळ, नारायण लोखंडे, रामेश्वर दौड, अजय सुर्यवंशी, सुरज मव्हारे, अमोल सपकाळ, विशाल घोडके, रणजित जाधव, दीपक जाधव, कृष्णा लोखंडे, अमोल खांडवे, प्रीतम देशमुख, समाधान लोखंडे, गजानन लोखंडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...