आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातेवाईक देणार तक्रार:19 दिवस उलटूनही शासकीय कंत्राटदार‎ पवार यांच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेचे शासकीय कंत्राटदार एम.‎ पी. पवार यांनी १५ मार्च रोजी जालना‎ शहराजवळील घाणेवाडी तलावात‎ आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात‎ समाेर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात‎ १९ दिवस उलटूनही पवार यांच्या‎ आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात‎ आहे. तपास अधिकारी म्हणतात पवार‎ यांचे नातेवाईक कुणी तक्रार द्यायला आले‎ नाही. घरातील काही जण आजारी आहेत.‎ त्यामुळे तक्रार देता आली नाही. येत्या‎ पाच-सहा दिवसांमध्ये तक्रार देणार‎ असल्याची माहिती मृताचे भाऊ सुधाकर‎ यांनी दिली.‎ जालना शहरातील प्रसिद्ध कंत्राटदार‎ एम. पी. पवार यांच्या आत्महत्येने एकच‎ खळबळ उडाली आहे. पवार यांच्या‎ माध्यमातून जालना शहरातील विविध‎ वॉर्डांमध्ये विविध विकासकामे झालेली‎ आहेत.

परंतु, पवार यांनी घाणेवाडी‎ तलावात आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे‎ एकच खळबळ उडाली आहे. कंत्राटदार‎ पवार यांनी कोणत्या कारणामुळे‎ आत्महत्या केली. याचे कारण अजूनही‎ समोर आले नाही. याप्रकरणी चंदनझिरा‎ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद‎ करण्यात आली आहे. याचा अधिक‎ तपास पीएसआय विठ्ठल शिंदे हे करीत‎ आहेत. तक्रार देण्यासाठी अजून कुणी‎ आले नसल्याची माहिती शिंदे यांनी दिली.‎ येत्या पाच-सहा दिवसांमध्ये याबाबत‎ तक्रार देणार आहोत, याबाबत तुम्हालाही‎ माहिती देत आहोत, अशी माहिती सुधाकर‎ पवार यांनी दिली आहे.‎