आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्गार:"मितभाषी माणसेही यशोशिखर गाठू शकतात'; सचिव कपिल

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही माणसे कमी बोलतात, पण काम जास्त करतात. अशा माणसांना आपण मितभाषी म्हणतो. परंतु अशी माणसेदेखील यशोशिखर गाठू शकतात. आज सेवानिवृत्त होत असलेले अमृतराव सवणे हे कलाध्यापक आहेत. त्यामुळे त्यांचे कौशल्य बोलण्यात नव्हे तर बोटात आहे असे उद्गार मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात यांनी काढले.

लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे कलाध्यापक अमृतराव सवणे हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बंडेराव सवणे, विजय राखे, प्रभाकरराव धुमाळ, शिवाजी सवणे, सिनेअभिनेते योगेश कुलकर्णी, संतोष डव्हारे, सोनाजी गाडेकर आदी उपस्थित होते. आकात म्हणाले, सवणे यांचा चित्रकला विषय असल्याने बोलणे कमी व फलकलेखन जास्त असते. शिक्षकांनी कालानुरूप स्वतःमध्ये बदल करावे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. आपल्या विषयाचे सखोल ज्ञान ठेवावे. स्पर्धेच्या युगात टिकून राहावे.शिक्षण क्षेत्रात वेळोवेळी होणाऱ्या बदलाची अपडेट माहिती बाळगावी. येणारा काळ कठीण आहे. पुर्वी दहावी-बारावी झाली की नोकरी मिळायची. आता तसे नाही.गुणवत्ता वाढली आहे. स्पर्धा वाढली आहे. कार्यक्रमाला सुभाषराव सवणे, सुधाकरराव सवणे, सुरेश सवणे, बाळासाहेब सवणे, उत्तम सवणे, विठ्ठल उगले, प्रल्हादराव सवणे, सुनील तायडे, अंकुशराव तेलगड, अखिल काजी, दत्ता सवणे, भारत सवणे, बाळासाहेब ताठे, रामजी कचरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सी.बी.लड्डा यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...