आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:तीनदा मुदतवाढ तरीही एसआरपीएफ जवानांच्या 557 घरांचे काम ठप्प

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एसआरपीएफ गट ३ मधील ११०० जवानांसाठी सुसज्ज निवासस्थाने उभारण्यात येत असून ३० जून २०१७ रोजी सुरू झालेले हे काम कंत्राटदारास ३० डिसेंबर २०१९ पर्यंत तीस महिन्यांच्या मुदतीत करायचे होते. मात्र चार वर्षे उलटूनही निवासस्थाने तयार झाली नाहीत. त्यामुळे जवान व त्यांच्या कुटुंबीयांना १९९० मधील जुनाट वसाहतीत गवताने वेढलेल्या धोकादायक घरात राहावे लागत आहे.

जिल्ह्यात ११०० जवान असून त्यांना राहण्यासाठी १९९० मधील जुनाट वसाहत आहे. ही वसाहत धोकादायक स्थितीत असल्याने जवानांसाठी मंठा चौफुलीजवळ पाच इमारतीत ५५७ निवासस्थाने उभारली जात आहेत. कुणाल स्ट्रक्चर इंडिया प्रा. लि. या कंपनीमार्फत हे काम सुरू आहे. २०१९ पर्यंत ही निवासस्थाने तयार करण्याची मुदत होती. परंतु, कोरोनाचे कारण दाखवून कॉन्ट्रॅक्टरने तीन वेळा मुदतवाढ करून घेतली. चार वर्षे उलटूनही निवासस्थाने तयार होऊ शकली नाहीत. यामुळे जवानांना सध्या जुन्याच वसाहतीत राहावे लागत आहे. त्यामुळे कुटुंबीयांना अनेक समस्यांशी लढावे लागते. वसाहतीत साप, विंचू निघतात. त्यामुळे कुटुंबीयांचा जीव नेहमी टांगणीला असतो.

माहिती घेऊन निर्देश देतो
एसआरपीएफ जवानांसाठी इमारत तयार झाली आहे. मुदतीत ही निवासस्थाने का झाली नाहीत, मुदत देऊनही काम रखडले असेल तर माहिती घेऊन निर्देश देतो. -बबनराव लाेणीकर, आमदार.

कामे न केल्याने कंत्राटदारास दंड
एसआरपीएफ जवानांसाठी बिल्डिंग उभ्या राहिल्या. मात्र सदनिकांचा ताबा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुदत वाढवून दिल्यावरही कामे न करणाऱ्या कंत्राटदाराला दंड लावल्याची माहिती आहे. -आर. रागसुधा, समादेशक, एसआरपीएफ जालना.

बातम्या आणखी आहेत...