आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसेवेकडे दुर्लक्ष:सुट्या संपल्या तरीही जि.प., महसूलसह कृषी विभागातील कामे मार्गी लागेनात

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापासून ते रविवारपर्यंत पूर्ण सात दिवस सरकारी कामकाज अपवाद वगळता जवळपास बंदच होते. या सात दिवसांच्या सुट्यांचा आनंद घेतल्यानंतर सोमवार ३१ ऑक्टोबर, मंगळवार १, २ नोव्हेंबर रोजी महसुल विभाग, जिल्हा परिषद विभागासह कृषि विभागातील कामांना सुरूवात झाली नाही. साहेब नाही नंतर या असे उत्तर शेतकरी, नागरिकांना मिळाल्याचे पहायला मिळाले. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे.

त्यामुळे प्रत्येक आठवड्यातील शनिवार व रविवारी सरकारी सुटी असते. याशिवाय उरलेल्या पाच दिवसांत सण-उत्सव, जयंती-पुण्यतिथीच्याही सुट्या येतात. पाच दिवसांत सायंकाळी एक तास जास्त काम होत असल्याचे सांगितल्या जात असले, तरी प्रत्यक्षात कार्यालयातील कामकाज सायंकाळी सहा वाजताऐवजी पाचवाजतापासूनच आटोपायला लागते. ही वस्तुस्थिती आहे. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फावत असले तरी नागरिकांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनापासून ते बुधवार, २६ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस सरकारी सुट्या होत्या.

त्यानंतर २७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान सरकारी सुटी नसली, तरी केवळ औपचारिकता म्हणून सरकारी कार्यालये उघडे होते. या दोन दिवसांत अनेक प्रमुख अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारीही अघोषित सुटीवर होते. त्यानंतर २९ ते ३० ऑक्टोबरदरम्यान पुन्हा शनिवार व रविवारच्या सुट्या आल्या. अशाप्रकारे हा संपूर्ण आठवडा सुट्यांमध्ये गेला. काही अपवादात्मक विभाग व अधिकारी सोडले, तर बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची ही संघटीत दादागिरीच असल्याचे खुद्द प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले आहे.

बँका, टपाल कार्यालये नियमित
राज्य सरकारचे अधिकारी पूर्ण आठवडाभर सुट्या उपभोगत असताना बँका, टपाल खात्यातील कर्मचारी मात्र रविवार व लक्ष्मीपूजनाची सुटी वगळता इतर सर्व दिवशी कार्यरत होते. त्यामुळे या कार्यालयांनी नागरिकांना सेवा दिली असली, तरी आता त्यांच्यातही सुट्यांबाबत भेदभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी
गेल्या दहा-बारा दिवसापासुन शासकीय अधिकारी-कर्मचारी कार्यालयात मिळत नाही. दिवाळीच्या सुट्ट्या संपुनही शासकीय अधिकारी-कर्मचारी अजूनही तळ्यावर आले नाही. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अधिकारी सर्वसामान्यांना मिळत नसल्याने कामे खोळंबली आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज असुन जे अधिकारी कर्मचारी काम करत नाही, त्यांच्याकडे कारवाई करण्याची गरज आहे.
नारायण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते

बातम्या आणखी आहेत...