आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागरूक:जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याने आपल्या कर्तव्याप्रति राहावे

माहोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्य जीवन जगत असताना आपण करीत असलेल्या कामासोबतच हरिनामही तितकेच महत्त्वाचे असून, आपल्या कर्तव्याविषयी जागरूक राहण्याचा सल्ला शरवायेश्वर संस्थान नाशिक येथील स्वामी जनार्दन स्वामींचे शिष्य माधवगिरी महाराज यांनी दिला.

जाफराबाद तालुक्यातील जनेश्वर संस्थान जवखेडा ठेंग येथे नवचंडी याग यज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते. तरुणांनी व्यसनाधिन न होता जागरूक राहून आपल्या गावाची, समाजाची व पर्यायाने देशाची सेवा करून आपल्या आई वडिलांचा उद्धार करावा. तसेच समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी झटावे आपल्या देशाचे सुरक्षा रक्षक यांच्या प्रती आदर भाव ठेऊन त्यांच्या मुळे आपण आज निर्भय पणे जीवन जगतो म्हणून नेहमी त्यांच्याशी कृतघ्न राहावे, असे सांगितले.

परम पूज्य जनार्दन स्वामी हे नेहमी दीन दुबल्यांसाठी झटले त्यांनी शाळा काढल्या गोसेवेचे महत्व पटवून दिले. हा त्यांचा विचार आपण सगळे मिळून पुढे नेले पाहिजे. आपल्या आई वडिलांचा आदर करून त्यांनी आपल्याला जन्म दिला त्याची परतफेड ही सत्कार्य व त्यांच्याशी प्रामाणिक राहुन करावी. म्हतारपणी त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, याची खबरदारी घेण्याचे आवाहन माधवगिरी महाराजांनी केले.

यावेळी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गोसेवा आश्रम जवखेडा ठेंग या ठिकाणी तीन दिवसीय नवचंडी याग निमित्ताने श्री अनंत विभूषित परम पूज्य माधवगिरी बाबा, महेश गिरी बाबा, राघवगिरी बाबा, ज्ञानेश्वर माऊली यांच्यासह शिवभक्त संतोष काबरा, पिंपळे गुरुजी तसेच परिसरातील जय जनार्दन भक्त परिवार उपस्थित होता..

बातम्या आणखी आहेत...