आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी कार्यशाळा:प्रत्येक महिलेने कायद्याचा वापर काटेकोरपणे करण्याची गरज..

बदनापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांनी कायद्याचा वापर काटेकोरपणे करावा, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी आर. एन. चिंमद्रे यांनी केले. कामांच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (मनाई, प्रतिबंध, निवारण) २०१३ , कायदेच्या अनुषंगाने बदनापूर पंचायत समिती येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यलाय जालना व पंचायत समित बदनापुर अणि कै. श्रीरंराव बहुउदेशिय सेवा भावी संस्था बुटेगांव यांच्या संयुक्त्‍ विद्यामाने कामांच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ विषय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील संबोध किनगांवकर, राज्य महिला आयोग जिल्हा समन्वयक ॲड. पी. जे. गवारे, पर्यवेक्षिका संगीता अंभोरे आदींची उपस्थिती होती. चिंमद्रे म्हणाल्या, कामांच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ ( मनाई, प्रतिबंध, निवारण ) २०१३ या कायदेच्या अनुषंगाने प्रत्येक कार्यालयात कलम ४ अन्वये अर्तगत महिला निवारण समिती स्थापन करणे गरजेचे आहे.

जर का एखादया मालकाने किंवा विभागप्रमुखाने समिती स्थापन केली नाही तर त्यांना ५० हजार रुपयांचा करण्यात येतो, असे या कायद्यात आहे. कामाच्या ठिकाणी एखादा पुरुष एखादया महिलेकडे शारिरिक संबध किंवा पुढाकार किंवा लैगिक संबधांची मागणी किंवा विनंती किंवा लैगिकतेने प्ररित शेरेबाजी करणे किंवा अश्लि चित्रे, पुस्तके दाखवणे, इतर कोणत्याही प्रकारचे लैगिक स्वरुपाचे अस्वागतार्ह वर्तन कर्मचारी करीत असेल तर त्याला या कलमानुसार लेखी माफी, लेखी समज देणे, सक्त ताकीद देणे, ठपका ठेवणे, बढती थांवविणे, पगारवाढ किंवा वाषिक पगारवाढ थांबविणे, प्रतिवादीला सेवामुक्त करणे, प्रतिवादीचे समुपदेश करणे, सामाजिक सेवा करणे,ई बाबत समिती कारवाई करण्याबाबत शिफरस करतील तसेच महिलांनी या कायदेचा वापर तलवारी सारखा की ढाली सारखा करायचा हे प्रत्येक महिलांनी ठरविले पाहिजे, असे चिंमद्रे यांनी सांगितले.

या वेळी संबोध किनगावकर यांनी महिलांबाबत विविध कायद्याची माहिती दिली. ॲड. गवारे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ मधील कलम ४ अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीचे कार्य व स्थानिक तक्रार निवारण समितीचे कार्य रचना कार्य पध्दती, तसेच विविध चित्रफितव्दारे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संगिता अभोरे यांनी केले. सुत्रसंचलन मिनाक्षी शिंदे यांनी केले. यावेळी गोसावी, जैन, साबळे, कल्याणकर, आशा मांदळे, मेहेत्रे, खरात, गागे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...