आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:प्रत्येकाला प्रथमोपचाराचे ज्ञान आवश्यक

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला प्रथमोपचाराचे ज्ञान आवश्यक असल्यामुळे स्काऊट गाईड मार्फत जिल्ह्यातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रथम उपचाराची कृती प्रशिक्षण देण्यात यावे, असे आवाहन डॉ. बळीराम बागल यांनी केले.

जालना भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना चा संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद मुलांची प्रशाला येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रथमोपचार कार्यशाळा शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ व शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगल धुपे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.संतोष जायभाये, डॉ संदीप गोरे, मधुकर घोडके, निलेश श्रीसुंदर यांची उपस्थिती होती.

उपस्थित सर्व स्काऊट गाईडच्या शिक्षकांना प्राथमिक प्रथमोपचार, प्रथमोपचार पेटी, वेगवेगळ्या प्रकारचे बँडेज , वेगवेगळ्या प्रकारचे तात्पुरत्या स्वरूपाचे स्ट्रेचर, कापणे, भाजणी, खरचटणे, कीटकदांश, नाकातून रक्तस्त्राव होणे, मज्जाघात, डोक्यावर झालेला आघात, रक्तस्त्राव, अशक्तपणा, फेपरे, उस्माघात, विषबाधा, फुफुस, हृदयाची काळजी घेणे, हृदयास कृत्रिम श्वास (सीपीआर) इत्यादी प्रथमोपचारावर आधारित आधारित उपस्थित शिक्षकांच्या विविध प्रश्नाला उत्तरे देण्यात आली.

शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी यांनी सांगितले, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत स्काऊट गाईड शिक्षकामार्फत प्रथमोपचाराचे शिबिर आयोजित केले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात यावे, असे सांगितले. यावेळी उपशिक्षणाधिकारी बी. आर. खरात, केंद्रप्रमुख जेठेवाड, मुख्याध्यापक उद्धवराव मस्के, प्रिया आधाने, मधुकर घोडके, व्ही. बी. गायकवाड, अख्तर जहाँ कुरेशी, विनोद चौबे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमोच सूत्रसंचालन के. एल. पवार यांनी तर सोनिया शिरसाट यांनी आभार मानले. यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...