आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीतील १९९३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी नुकतेच एका स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी गुरुजनांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बापुसाहेब कुलकर्णी, शिवणगिरीकर, वाघ, शिंदे, खान, पाटील, डाखोरकर, पवार, प्रा. रंगनाथ खेडेकर, पेरके आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रा.लक्ष्मण गादगे, फिरोज खान, शिवनाथ खेडेकर, सुभाष राठोड, रचना लाहोटी, विद्या वाघ, संजय राठोड, महावीर कुरकुटे आदींनी मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. रंगनाथ खेडेकर म्हणाले, संघर्ष आणि संस्कारातून निर्माण झालेली ही पिढी येणारे आव्हाने स्विकारण्यास समर्थ आहे. या शाळेने दिलेले संस्कार ते आपल्या दररोजच्या जीवनात आचरणात आणतात म्हणून आज ते यशस्वी जीवन जगत आहेत यावेळी माजी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन संजय टकले यांनी तर अंकुश राठोड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक जैस्वाल, माधव चव्हाण, विठ्ठल भुतेकर, प्रकाश कुलकर्णी, विठ्ठल खलसे, डॉ. सुभाष जाधव, शैलेश बजाज, अंकुश चव्हाण सुभाष शिंदे, एकनाथ पवार, सरिता गिरी, रेखा देवमुरारी, संगीता चव्हाण, दगडाबाई लगडे, भगवान, हिवाळे, हनीफभाई, भिमराज राठोड, विलास सहाने, जानुजी चोरमारे, सुनील जाधव, पंढरीनाथ भुतेकर, संभाजी गादगे, नंदकिशोर कारेगावकर, संतोष कारेगावकर, कुलभ्ूषण उखळकर आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.