आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:मंठा येथील नेत्र शिबिरात 160 रुग्णांची तपासणी; 25 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार

मंठाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गणेश मंगल कार्यालयात बुधवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिलेल्या २५ रुग्णांवर लवकरच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

येथील सराफा व्यापारी वैभव गणेश शहाणे यांनी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. यावेळी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुरेश घुले उपस्थित होते. उदघाटन बाजार समितीचे माजी सभापती सतीश झोल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच बाबूराव शहाणे,माजी सभापती संतोष वरकड, नगरसेवक अचित बोराडे, प्रल्हादराव बोराडे, संचालक वैजनाथ बोराडे, कैलास बोराडे,सखाराम बोराडे, साहित्यिक दत्तोपंत डहाळे, सिराज पठाण, कय्युम कुरेशी, जे.के.कुरेशी, अच्युतराव सराफ, भगवान गायकवाड, महादेव वाघमारे, शेख एजाजुद्दीन आदी उपस्थित होते. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून घेतलेल्या या समाजपयोगी उपक्रमाची वक्त्यांनी प्रशंसा केली. २५ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्या सर्व रुग्णांची वाहनांची आणि राहण्याचीदेखील मोफत व्यवस्था केली जाणार असल्याचे वैभव शहाणे यांनी सांगितले.