आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रम:पदवीच्या 3 लाख विद्यार्थ्यांची 22 नोव्हेंबरपासून परीक्षा ; तृतीय वर्षाचे वेळापत्रक जारी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना २२ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. या परीक्षा प्रथम वर्षच्या प्रथम सत्र वगळून होत असल्याची माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी मंगळवारी (१ नोव्हेंबर) दिली आहे.

बी.ए., बी.एस्सी आणि बी.कॉम अभ्यासक्रमांच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. जालना, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यातील २४० परीक्षा केंद्रांवर ३,१२,२०९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी प्रथम वर्षातील प्रथम सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचीही रिपिटर म्हणून परीक्षा घेतली जाणार आहे. कला व मानव्य विद्याशाखेचे एकूण १, ४८, ९१७ विद्यार्थी परीक्षा देतील. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्या शाखेतील ४३, ३६९ जण परीक्षा देणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाचे सर्वाधिक १, १९, ९२३ परीक्षार्थी आहेत. प्रथम वर्ष व अन्य व्यावसायिक पदवी, अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे डॉ. मंझा यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...