आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जिल्हा रुग्णालयात इपिलेप्सी /झटके/मिरगी या आजारातील ० ते १८ वयोगटातील ईईजी तपासणी शिबिर घेण्यात आले.शिबिरासाठी डॉ. वर्षा वैद्य (बाल मेंदुविकारतज्ज्ञ,) आणि त्यांची टीमने ५५ बालकाची तपासणी केली. त्यापैकी ४९ बालकाची ईइजीची तपासणी करून योग्य निदान करून निश्चित असे मोफत असे उपचार (औषधी, फिजिओ, विशेष शिक्षण, ओटी, समुपदेशन) देण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांनी उदघाटन केले. यावेळी अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायके, बालरोगतज्ज्ञ अधिकारी डॉ. सोनखेडकर, डॉ. उदय गोंदीकर यांची उपस्थिती होती. डॉ. घोडके म्हणाले, झटके, इपिलेप्सी या आजाराबद्दल बरेच गैरसमज आहे त्यामुळे पालकांनी असा आजार दिसून आल्यास वेळ वाया न घालवता किंवा भोंदूबाबा न जाता सरळ डॉ जावे त्यामुळे वेळेत उपचार मिळाल्यास हा आजार पुर्णपणे बरा होऊ शकतो, असे सांगितले. यावेळी डॉ. मीनल देवळे, डॉ. अर्चना खंडागळे, डॉ. अंकुश डोंगरे, डॉ. अमितकुमार जैस्वाल, अरुण सुर्वे, गजानन खरात, राजू खिल्लारे, श्रीधर सरकटे, वर्षा निर्मळ, तेजस्विनी वाघमारे, तौफिक पठाण आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.