आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंठा तालूक्यातील तळणी परीसरातील पूर्णा नदीपाञातील लिलाव झालेल्या वाळू घाटाचे उत्खनन झालेल्या ठिकाणचे पंचनामे करून अतिरीक्त वाळू उपसा केलेल्या लिलाव धारकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, किर्ला वाघाळा, किर्ला टाकळखोपा, भुवन, वझर सरकटे या वाळू घाटावर लिलाव धारकाने शासनानाच्या नियमापेक्षा जास्त उत्खनन केले आहे.
सर्व वाळू घाटावर मशनरीच्या सहाय्याने उत्खनन झाले असून याकडे मंठा महसूल प्रशासनाने कानाडोळा केला आहे. आजपर्यन्न वाळू घाटावर एकही ठोस कारवाई न झाल्याने लिलाव धारकाचे फावत आहे. दररोज शेकडो वाहने विदर्भाकडे वाळू घेऊन जात आहेत. पूर्णा नदीपात्रातील अनेक गावामध्ये शासनाची परवानगी नसतानाही हजारो ब्रासची वाळूचा उपसा केला जात असून याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सरकटे यांच्यासह आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.