आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक स्वास्थ्य धोक्यात:मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात

तीर्थपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल व इंटरनेटच्या अतिरिक्त वापरामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले असल्याचे डॉ. सुश्रुत पाटील यांनी सांगितले.तीर्थपुरी येथील मत्स्योदरी कला महाविद्यालय व शांती नर्सिंग होम औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मानसशास्त्र विभाग अंतर्गत आयोजित मोबाईल एडिक्शन इट्स इफेक्ट्स अँड रॅमिडइस या विषयावर एक दिवसीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ.सोनाली देशपांडे, डॉ. श्रुती ढवळे, प्राचार्य डॉ. सुनील खांडेभराड, श्री. पवार उपस्थित होते. डॉ. सुश्रुत पाटील म्हणाले, जेंव्हा एखाद्या व्यक्तीला सवय लागते आणि त्यानंतर ती व्यक्ती त्याचा आहारी जाते तेव्हा ते व्यसनाधीन होतात, अशावेळी आपले मानसिक स्वास्थ्य तपासणी गरज असते.

आज मोबाइल व इंटरनेटच्या अतिरिक्त वापरामुळे मानसिक स्वास्थ धोक्यात आहे. डॉ. सोनाली देशपांडे विचार मांडताना म्हणाल्या, माणसाचे मन व्यसनाधीन होते, तेव्हा मनाचे आरोग्य बिघडते, अशा वेळी मनाचे आरोग्यची जोपासना करण्याची गरज आहे. तर डॉ .श्रुती ढवळे यांनी सांगितले की. भीती वाटत असेल किंवा मानसिक तणाव निर्माण झाला असेल तर लगेचच सांगितले पाहिजे, जर लवकर उपचार झाले तरच व्यक्तीचे आयुष्य सुधारु शकते.

नाहीतर त्याचे वाईट परिणाम होतात. या कर्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रबोधन कळंब यांनी केले. दरम्यान मानसशास्त्र विभाग अंतर्गत मानस मंडळाची स्थापना करून मानस मंडळाचे सदस्य राखी उढाण, ऋतुजा बजाज, शितल बोबडे, यांनी तयार केलेल्या मानस या भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. रमेश जोगदंड, डॉ. भगवान सिंग बैनाडे डॉ. प्रदीप जाधव ,डॉ. रामलीला पवार, डॉ. जायदा शेख, प्रा. रेखा अपेट, प्रा. अतुल भालेकर, प्रा. गाढवे, प्रा. आर. कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रदीप लगड यांनी, तर कल्पना विटोरे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...