आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिन:पथसंचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांनी जिल्हाभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह, नेटकऱ्यांकडून सुभेच्छा

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, सामाजिक संस्थांच्या कार्यालयात केले ध्वजारोहण

१ मे महाराष्ट्र व कामगार दिन जिल्हाभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना या दिनी गुणपत्रकही वाटप करण्यात आले.

जिजाऊ महाविद्यालय
जिजामाता ग्रामीण विकास शिक्षण संस्था जाफराबाद संचलित, जिजाऊ कला व विज्ञान महाविद्यालय वरुड बुद्रुक. १ मे महाराष्ट्र व कामगार दिन विलास शिंदे व सरपंच संतोष ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संपन्न करण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी. भालके, सुरेश कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य विजय पवार, प्राचार्य सिद्धेश्वर लोखंडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन देशमाने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना प्राध्यापक जी. एस . लांडगे यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस. पी. भालके यांनी आपल्या भाषणातून कामगार दिनाच्या शुभेच्छा देत असताना कामगार न बनता मालक बना. या विषयावर मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम व व्यवसायाकडे जास्तीत जास्त प्रमाणात वळावे व व्यवसायाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा यासह विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर. एन. पठाण व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.

ग्रा.पं. कार्यालय सिंधी काळेगाव
जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे ग्रामपंचायत कार्यलयामध्ये १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सरपंच लक्ष्मीबाई गिराम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच सय्यद रशीद, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गिराम, विष्णुपंत गिराम, साळुकराम गिराम,भागवत गिराम, ग्रामसेवक मिलींद कोरके,तलाठी व्ही कणके, जनार्धन गिराम ,सखाराम मगर, संजय गिराम,भाऊसाहेब शेवाळे, आरोग्य सेविका संगिता पाखरे, डॉ. वर्षा लोणकर, अंगणवाडी सविता राऊत राऊत, नजिमा सय्यद आदी उपस्थित होते.

चितळी पुतळी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिनाचा सोहळा चितळी पुतळी गावातील मुख्य शासकीय समारंभ ग्रामसंसद कार्यालय चितळी पुतळी येथे हा सोहळा गावचे प्रथम नागरिक सरपंच स्वप्ना राजेंद्र वांजुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उपसरपंच कल्याणराव उरदुखे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लगडे, ज्ञानेश्वर माऊली काकडे, गोरखनाथ माळी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती हेाती.

तीर्थपुरी नगरपंचायत
महाराष्ट्रदिना निमित्त तीर्थपुरी नगरपंचायत येथे नगराध्यक्षा अलका चिमणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष शैलेंद्र पवार, मुख्याधिकारी गौरवकुमार खैरनार, न. प. सभापती शिवाजीराव बोबडे, तुळशीराम वानखेडे, नगरसेवक श्रीकृष्ण बोबडे, रमेश बोबडे, रमेश कासार, गजानन चव्हाण, रवींद्र बोबडे, नारायण बोबडे, तलाठी राजु शेख, पोलीस जमादार नारायण माळी, श्रीधर खडेकर, योगेश दाभाडे, मुक्ताराम वाजे, खराबे सर, न. पं. कर्मचारी, व नागरिक उपस्थित होते.

प्रबोधनकार ठाकरे विद्यालय
अंबड तालुक्यातील शहागड येथील प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक महेश गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ध्वजारोहणासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर धनवडे यांनी केले तर आभार ताहेर तांबोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम केले.

राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल
परिसरातील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात आले.या वेळी संस्थेच्या अध्यक्षा रेवतीताई माटे यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गाढेकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्रोफेसर डाॅ.सुखदेव मांटे, खराडे साहेब, राजु काकड यांची उपस्थित होती. तसेच शाळेचे सहशिक्षक मंगेश वारे, स्वाती भोगांवकर व शिक्षकेत्तर कर्मचारी यमुना ढोके उपस्थित होते.

आदर्श कला महाविद्यालयात
भोकरदन तालुक्यातील विझोरा येथील आदर्श कला महाविद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात येऊन सरस्वती पूजन करून महापुरषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य भारत घुनावत, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व एन. एल. फुसे, गणेश तेलंग्रे, सागर गारोडी, कुणाल नागपुरे, अभिजीत बेराड, सागर तेलंग्रे, निलेश बोडखे व ऋषिकेश गावंडे उपस्थित होते.

यशवंत कनिष्ठ महाविद्यालय
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ध्वजारोहण संस्थापक अध्यक्ष विजय तांबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित प्राचार्य राहूल गवई, राजकुमार वाघमारे, प्रशांत गायकवाड, विनोद दुतोंडे, किशोर खर्डे, सतिष जाधव, नागसेन वानखडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल
येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मंठा रोड जालना येथे १ मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव प्रो. डॉ. सुगदेव मांटे, अध्यक्षा रेवती मांटे, बापूराव शेजुळ, विठ्ठल देंडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्राचार्या लतिका मनोज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी एलिया गायकवाड, वरूण अंबेकर, अपर्णा भंडारे, सोनाली खंदारे, अभिजित भंडारे, महेंद्रसिंह परदेशी, रविंद्र गिरे, कीर्ती मिटकरी, मोहिनी श्रीवास्तव, अयोध्या पितळे, गिरीराज कुलकर्णी, नारायण मोरे, लक्ष्मी ठोकरे, शोभा जगधने, राजू काकडे उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराज विद्यालयात
जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गरबडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आल. या वेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सी.जी. वाघमारे, तसेच शिक्षक शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. एस.आर. कुलकर्णी, वाय. बी. मदन, डी. एन. सोनकांबळे, पी. पी. नागरे, ए. बी. देशपांडे, एल. बी. जाधव, आर. एस. ठाकरे, एस. बी. राऊत, एम. ए. खरात आदींची उपस्थिती होती.

एस.के. खोमणे महाविद्यालय
कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कोषाध्यक्ष रवी खोमणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अनिल कुलकर्णी, श्रीराम आटोळे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने सहभाग घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...