आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:लघुउद्योग भारती जालनाची कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अमर लाहोटी, सचिव किशोर देवीदान

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लघुउद्योग भारती जालना यांची वर्ष २०२२-२३ या वर्षाची नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ सर्व सदस्यांच्या उपस्थितीत रविवारी संपन्न झाला आहे. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अमर लाहोटी, सचिव किशोर देवीदान तर कोषाध्यक्षपदी सतीश भक्कड यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमाला लघुउद्योग भारती मराठवाडा प्रांताचे अध्यक्ष अशोक राठी, अविनाश देशपांडे यांची उपस्थिती होती. राठी यांनी देशात लघुउद्योग भारतीचा विस्तार कसा झाला हे सांगितले तर देशपांडे यांनी लघु उद्योग भारती उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कशी मदतशील असल्याचे म्हणाले. मावळते अध्यक्ष विवेक मणियार यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा त्यांनी सादर केला.

यामध्ये लघु उद्योग भारती जालनातर्फे जवळपास ५० हजार लसीकरण करण्यात आले. रक्तदान शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आले तसेच इंडस्ट्रियल व्हिजिट व औद्योगिक संस्थांशी निगडित विविध कार्यक्रम व दीपावली स्नेहमिलन आशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नूतन अध्यक्ष अमर लाहोटी यांनी आगामी वर्षात जे काही उपक्रम राबवायचे आहे याची माहिती दिली. यामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून हे वर्ष साजरे करत कार्य करणार आहे.

यामध्ये मेक इन इंडिया व जालना येथून एक्स्पोर्ट वाढवण्यासाठी प्रयत्न करणार तसेच त्यांनी या वर्षाची संचालक मंडळाची कार्यकारिणी जाहीर केली. ज्यामध्ये विवेक मणियार, संजय अग्रवाल, पंकज कासलीवाल, पियुष मुंदडा, सुनील बियाणी, राजेश अग्रवाल, गणेश बियाणी, अजय गट्टाणी, अजय करवा, अविनाश देशपांडे, अशोक राठी, दीपक सोमाणी,राजेश कामड,अनिल तलरेजा, सुनीलभाई रायठठ्ठा, विष्णू करवा, जितेंद्र राठी, पंकज लड्डा, प्रग्नेश केनिया आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमात नवीन लघु उद्योगांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. मावळते अध्यक्ष विवेक मणियार यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देऊन सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...