आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रप्रदर्शन:आजपासून केंद्राच्या योजना, गती-शक्तीवर चित्रप्रदर्शन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केन्द्रीय संचार ब्युरोचे औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय, दक्षिण मध्य रेल्वे व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जालना रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर केंद्र सरकारच्या आठ वर्षपुर्तीनिमित्त “शासकीय जनकल्याण योजना”व “गतिशक्ति” विषयावर १७ ते २१ डिसेंबरदरम्यान मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे व जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत होणार आहे. याठिकाणी विविध सरकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येतील. या प्रदर्शनाला लोकप्रतिनिधींबरोबरच सामान्य नागरिकांसह शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी भेट देणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...