आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:काळेगाव येथे अॅग्रोव्हिजन गटशेती संघाच्या चर्चासत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन; अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे यांची उपस्थिती होती

टेंभूर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथे चर्चासत्र पार पडले. यावेळी उन्हाळी मिरची पीकासह शिवारफेरी करण्यात आली. वरिष्ठ शास्त्रज्ञ मोसंबी फळ संशोधन केंद्र बदनापुरचे प्रमुख डॉ.संजय पाटील सोयगावकर, कृषि विज्ञान केंद्र बदनापूरचे विषय विशेषज्ञ डॉ. दिपक कच्छवे, अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी नंदकिशोर देशमुख यांनी वन प्रार्थना म्हटली. शेख असद यांनी सर्वाचे स्वागत केले. त्यानंतर विविध गावाच्या प्रमुखांनी आपापले गावचे अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाला कैलास सुदेवाड, दत्तात्रय सवडे, सुधीर जोशी, भाऊसाहेब महाराज सवडे, सोमिनाथ सवडे, सखाराम चव्हाण, डी. ए. चव्हाण, विनोद पिंपळे, दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...