आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:लायन्स क्लबतर्फे परतूर येथे शंभरावर रुग्णांची नेत्र तपासणी

परतूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ परतूर तर्फे दर शनिवारी अत्यंत माफक दरात नेत्र तपासणी केली जाते. तपासणी साठी नाममात्र २० रुपये एवढे शुल्क आकारले जाते. दर शनिवारी शंभरच्या जवळपास रुग्ण या ठिकाणी तपासणी करण्यात येत असतात. तपासणीत मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते.

शहरातील अमित हॉस्पिटल येथे शनिवारी आयोजित नेत्र तपासणी शिबिरात लायन्स क्लबच्या संजीवनी खालापुरे, डॉ. सुनिता खालापुरे, अरुण शेपाळ आदींनी सेवा दिली. गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन परतूर लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...