आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोतीबिंदू शस्त्रक्रिया:असोला येथे आयोजित शिबिरात 130 रुग्णांची नेत्र तपासणी ; नेत्र तज्ञांची कमतरता

बदनापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या पुढाकाराने बदनापूर तालुक्यात सुरू असलेल्या मोफत मोतीबिंदू शसत्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराअंतर्गत तालुक्यातील असोला येथे घेण्यात आलेल्या शिबिरात १३० रूग्णांची तपासणी करण्यात येऊन १२ रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या तारखा देण्यात आल्या.

बदनापूर तालुक्यात नेत्र तज्ञांची कमतरता असल्यामुळे व ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शास आल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक गाव-खेडयात नेत्र शिबिरे घेऊन मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांना दृष्टी देण्यासाठी मोफत शस्त्रक्रिया करण्याचे काम डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी सुरू केलेले आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवारी असोला येथे न्यू लाईफ केअर हॉस्पिटल बदनापूर व लायन्स नेत्र रुग्णालय चिकलठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घेण्यात आले. डोंगराळ भागात असलेल्या या छोटयाशा गावात झालेल्या या शिबिरास ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच सुरेश मुटकुळे, काकासाहेब खैरे, गुलाब मुटकुळे यांनी सहकार्य केले.

या प्रसंगी डॉ. पाथ्रीकर व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राठोड यांनी सदरील वृक्ष संवर्धन करण्याची ग्वाही देऊन या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोदंवला. १२ रूग्णाना मोतीबिंदू निदान झाल्यामुळे त्यांच्यावर लॉयन्स नेत्र रूग्णालय चिकलठाणा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून रूग्णांना गावापासून ने – आण करणे तसेच खान-पान व निवासाची व्यवस्था डॉ. पाथ्रीकर करणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...