आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक उपक्रम:जवसगावात 193 रुग्णांची नेत्र तपासणी; औषधांचे केले मोफत वाटप, उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

बदनापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या बदनापूर न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी बदनापूर तालुक्यात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यास सुरवात केलेली असून रुग्णांना येण्या जाण्यापासून ते औषधी व शस्त्रक्रिया तसेच जेवणाची व्यवस्था त्यांनी स्वतः करून एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतले.

५ मे रोजी जवसगाव येथे नेत्र तपासणी शिबीरात १९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात २३ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी रुग्नांची खरी अडचण लक्षात घेऊन बदनापूर तालुक्यात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन प्रत्येक गावात सुरु केले आहे. गावात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जाऊन नेत्र तपासणी करतात व रुग्णांना मोफत औषधी,चष्मे वाटप करतात. ज्या रुग्नांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे अश्या रुग्नांना शस्त्रक्रियेसाठी तारीख दिली जाते आणि त्या तारखेला रुग्नांना चिकलठाणा येथील नेत्र रुगालयात नेऊन दाखल करून त्या ठिकाणी राहण्याची,जेवणाची व शस्त्रक्रियेसाठी इतर खर्च संस्थेच्या वतीने करून शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना घरी सोडले जाते. मागील दोन महिन्यात जवळपास १० मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली. शिबिरांच्या माध्यमातून १०० लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. यावेळी सरपंच अयोध्या गारखेडे, मनीषा गारखेडे, भरत गारखेडे, विकास दाभाडे, शैला वैद्य, नंदा गारखेडे, सुनील वाकोडे, ग्रामसेविका एन. एस. खरात आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...