आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागातील असूनही आईच्या धाकामुळेच मी नाटक व सिने सृष्टीत यशस्वी होवू शकलो, त्यामुळेच कुटूंबाचा विश्वास खूप महत्वाचा आहे, असे मत प्रसिद्ध सिने अभिनेते व सैराट चित्रपटातील परशाच्या वडिलांची भूमिका साकारलेले संभाजी तांगडे यांनी व्यक्त केले. जालना शहरातील अंकुशराव टोपे महाविद्यालयात शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप व पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तांगडे बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित होते. या वेळी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध क्षेत्रात यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेल्या शैक्षणिक प्रगती बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राध्यापकांमध्ये डॉ. दादासाहेब गजहंस, डॉ. शांताराम रायपुरे, डॉ. मसुद अन्सारी यांची अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल तर डॉ. बी. आर. शिंदे, डॉ. एस. व्ही. वाडेकर, डॉ. उढाण, डॉ. प्रदीप लेकुरवाळे यांचा पीएच. डी. प्राप्त केल्याबद्दल तसेच डॉ. रुपाली कदम यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
मार्च २०२२ च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आला. क्रीडा स्पर्धेत विद्यापीठ व राज्य पातळीवर सहभागी साक्षी आकमार, मुक्ता बोरडे, शुभांगी वाबळे, रोहित बिन्नीवाले, सचिन चव्हाण यांचा ट्रॅक सुट देवून सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय पातळीवर बुद्धीबळ स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेला दिव्यांग खेळाडू आदित्य घुले याचाही विशेष गौरव करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.