आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप:तहसीलदार कडवकर यांना निरोप

अंबड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसीलदार विद्याचरण कडवकर यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्ली कार्यालयात बदली झाल्याबद्दल तहसील कार्यालय व महसूल विभागाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस होते. तहसीलदार गौरव खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्याचरण कडवकर व त्यांच्या पत्नी राधाताई कडवकर यांचा सत्कार करण्यात आला.

तहसीलदार कडवकर म्हणाले की, अंबड शहरवासीयांनी दिलेले प्रेम, स्नेह, जिव्हाळा माझ्या स्मरणात राहील. कार्यक्रमास नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी, मंडळाधिकारी भाग्येश भार्डीकर, अंजली कुलकर्णी, तलाठी संघाचे अध्यक्ष कृष्णा मुजगुले, वकील संघाचे अध्यक्ष के. के. वाघमारे, विठ्ठल गाडेकर, मोरे, दिवाकर जोगलादेवीकर, अॅड. आशाताई गाडेकर, अॅड. कृष्णा शर्मा, अॅड. युवराज शर्मा, प्रकाश नारायणकर, सोडाणी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...