आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओला दुष्काळ:शेतकरी पुत्रांचा ऑनलाइन ट्रेंड ; अतिपावसामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे

भोकरदन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरीपुत्रांनी सोशल मीडियावर ओला दुष्काळ जाहीर करण्याचा सुरू केलेल्या ऑनलाइन ट्रेंडला प्रतिसाद मिळत आहे. सरकार व कृषिमंत्र्यांवर टीका केली जात आहे. समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत व सामाजिक कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. महिनाभरात राज्यात अतिपावसामुळे खरीप हंगाम वाया गेला. काढणीला आलेले सोयाबीन, कपाशी, मका, भुईमूग, उडीद, भाजीपाल्यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उन्हाळी हंगाम वाया गेला. आता हातातोंडाशी आलेली खरीप पिके शेतात कुजली आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या वर्षी दिवाळी साजरी करता आली नाही.याविषयी विरोधी पक्षाने आवाज उठविला नाही.

ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. मात्र याकडे शासन लक्ष देत नाही. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, असे सांगितले. यामुळे संतप्त युवक शेतकऱ्यांनी सोशल युवक शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर ऑनलाइन ट्रेण्ड मीडियावर ऑनलाइन ट्रेण्ड सुरू केला आहे. व्हॉट्सॲप, फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर करीत युवकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावरील पोस्ट सगळीकडेशेअर होत आहेत. सरकार व पंचनामे करण्यास नकार देणाऱ्या महसूल यंत्रणेविरोधात टीकेची झोड शेतकरीपुत्रांनी उठवली आहे. मनाला भिडणाऱ्या टॅगलाइन, पिकांचे झालेले नुकसान, शेतकरी कुटुंबांची दयनीय अवस्था याचे फोटो शेअर केले जात आहेत.

शेतकरीपुत्रांनी सुरू केलेल्या ऑनलाइन ट्रेण्डची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने ओला दुष्काळी जाहीर करावा, तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी तरुणांसह शेतकऱ्यांनी केली आहे. मागील आठवड्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीचे पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, असे आश्वासन दिले होते. अद्यापही शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत मिळाली नसल्याचे शेतकरी सांगतात.

शेतकऱ्यांचा मदत करा परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. दहा ते बारा दिवस उलटूनही सरकारकडून एक रुपयांची मदत मिळाली नाही. पैसे नसल्याने दिवाळी सणही अंधारात साजरा केला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. रब्बी हंगाम पेरणीसाठी मोफत बियाणे आणि तत्काळ मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...