आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयाेजन:कृषी विज्ञान केंद्राकडून मिळणार दैठणा येथे शेतकरी महिलांना मशरूमपासून विविध पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृ़षी विज्ञान केंद्र, खरपुडी यांच्या वतीने ११ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी, महिला, युवक, युवतींसाठी विविध प्रशिक्षण हाेणार आहे. दहा २१ ऑक्टोबर रोजी मशरूमपासून विविध पदार्थांची निर्मिती कशी करता येईल या अनुषंगाने घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथे शेतकरी महिलांसाठी तर कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे पोषक तृणधान्यांवरील प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत ११ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण होणार आहे. इच्छुकांनी कृषी विज्ञान केंद्रातील प्रा. संगीता कऱ्हाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आले आहे.

जालना शहरातील कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी यांच्या वतीने नेहमीच विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. यात विविध प्रशिक्षण दिल्या जाते. शेतकऱ्यांसाठी, युवक, युवतींसह शेतकरी महिलांसाठी मोफत प्रशिक्षणे आयोजित केली जातात. दरम्यान, ११ ऑक्टोबर पोषक तृ़णधान्यांवरील प्रक्रीया व मूल्यवर्धन याबाबत कृषी विज्ञान केंद्रात हे महिला व युवतींसाठी हे प्रशिक्षण होत आहे. अन्न प्रक्रीया उद्योग, क्षमता बांधणी प्रशिक्षण, एकात्मिक शेती पद्धत, पशुधनाचे महत्त्व, डाळिंब फळांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान, कंपोस्ट खत बनविण्याच्या विविध पध्दती, पावसाचे पाणी साठवण्यासाठी विविध उपाययोजना, प्रमुख पिकांमधील एकात्मिक कीड व्यवस्थापन, ज्वारीवरील प्रक्रिया आणि मूल्यवर्धन आदी विषयांवर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

शेतीमधील मधमाशांचे महत्त्व’ विषयावर मार्गदर्शन
मंठा तालुक्यातील मोसा येथे शेतकऱ्यांसाठी ‘शेतीमधील मधमाशांचे महत्त्व’ या विषयावर २० ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
कृषी विज्ञान केंद्र खरपुडीच्या वतीने शेतकऱ्यांसह युवक, युवती, महिला शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत. कृषी, उत्पादन, पशुधन आदी विषयांवर ही प्रशिक्षणे होत आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...