आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दिलासा:पावसाच्या पुनरागमनामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुनरागमन केले. गुरुवारी रात्री, शुक्रवारी अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा, बदनापूर तालुक्यातील चिखली, जालना तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री तर शुक्रवारी अन्वा येथे दमदार पावसाने हजेरी लावली. १५.२० मिमी पावसाची नोंद झाली.

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी लागत आहे. परिणामी पिकांना जीवदान मिळत आहे. जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत सरासरी १५.२० मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. अशी : जालना १.६० , बदनापूर २०.६०, भोकरदन ५५.७०, जाफराबाद ३२.३०, परतूर ०. १०, मंठा ३.१०, अंबड १, घनसावंगी ०.१० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्हयात आज पर्यत एकुण ९४.६९ मि.मी. नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...