आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्यास आंदोलन करण्याचा इशारा

भोकरदन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. खरीप हंगाम संपला, मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले नाही.शेतकऱ्यांना सावकरी कर्ज काढून पेरणी करावी लागली.त्यानंतर परतीच्या पावसाने भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सर्व पिके खराब झाली.

आता रब्बी हंगाम सुरु होत असतांनाच महावितरण कार्यालय शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करून शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांच्यासह संदिप भोकरे, राहुल साबळे, राजू ढोके, सोमिनाथ ढोके,अनिल साबळे,स्वप्निल खरात, ज्ञानेश्वर वर्पे आदींनी महावितरणचे कार्यकारी उपअभियंता दिपक तुरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...