आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:"शेतकऱ्यांनो, यंत्राने सोयाबीन काढताना काळजी घ्या' ; सतर्कता बाळगा

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सोयाबीन सोंगणी व काढणीचा हंगाम सुरु आहे. मात्र, पिक काढणी करतानी घाईगडबड केल्याने मळणीयंत्रात अनेकांना जीव गमवावा लागला तर कित्येकांना अपंगत्व आले. त्यामुळे पिक काढणी करताना शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. सद्यस्थितीत तालुकाभरात सोयाबीन काढणीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांकडून कामाची गडबड केल्या जाते. परंतू मळणी यंत्रणातून सोयाबीन काढताना केलेली घाई मृत्यूच्या खाईत नेत असल्याच्या अनेक दुर्देवी घटना भोकरदन तालुक्यात घडल्या आहे.

जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या अशा अपघाती मृत्यूमुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर आल्याची उदाहणे आहेत. जगाचा पोशिंदा संबोधल्या जाणारा शेतकरी कष्टाने शेती पिकवितो. उन-वारा पाऊस याची तमा न बाळगता पोटच्या मुलाप्रमाणे पिकाची काळजी घेतात. त्या शेतकऱ्याने स्वतःच्या जीवाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सोयाबिन काढणीवेळी मळणीयंत्रापासून सावध राहावे. काढणीवेळी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नये. विचारांच्या तंद्रीत व केलेल्या घाईमुळे दुर्घटना घडत असतात. तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटना कोणावरही ओढावू नयेत. यासाठी शेतकरी व मळणीयंत्र व्यावसायिकांनी विशेष काळजी घ्यावी तसेच महिलांनी साडीचा पदर व्यवस्थित सांभाळावा. अत्यंत सावधगिरीने सोयाबिनची काढणी करण्याची गरज आहे.

मळणी यंत्र सुरू असताना काळजीने काम करावे मळणी यंत्रामध्ये पीक न भरता चालू करून पाहावे. यावेळी यंत्रातून काही अनावश्यक आवाज येतात का? पट्ट्यांना योग्य प्रमाणात ताण आहे किंवा नाही? चालू स्थितीत पट्टे निसटतात का, या गोष्टींकडे लक्ष द्यावे. याचप्रमाणे चालण्याची गती योग्य आहे का, पंखे व्यवस्थित फिरतात का आदी बाबी तपासून पाहाव्यात. प्रवीण देशमुख, ट्रॅक्टर व यंत्र व्यावसायिक, भोकरदन

बातम्या आणखी आहेत...