आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्याजाच्या पैशांची वारंवार मागणी करत मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ३० वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अंबड तालुक्यातील पागीरवाडी शिवारात ९ मार्च रोजी ही घटना घडली. भारत काळे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी उषा काळे यांनी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी भोजने, कुंडलिक शिवाजी भोजने, रख्माजी कुंडकर व केकेबाबा भोजने यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गत आठवड्यात शनिवारी भारत काळे यांना नमुद आरोपींनी घरी येऊन झोपेतून उठवून दुचाकीवर बसवून नेले होते.
यावेळी विचारपूस केली असता, तुझ्या नवऱ्याने आमच्याकडून व्याजाने ३५ हजार रुपये घेतले आहे. जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत त्याला सोडणार नाही असे म्हणून भारत यांना ओढत चापट-बुक्याने मारहाण करत घराबाहेर ओढत नेले. सोडवण्यास गेले असता, चापटबुक्याने मारहाण करुन ढकलून दिले. सायंकाळी ६.३० वाजता सुमारास घरी आल्यावर नमुद आरोपी पैशासाठी त्रास देत असल्याची आपबीती त्यांनी सांगितली होती. याच त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची तक्रार पत्नी उषा यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.