आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉवरग्रीड कापोर्रेशनच्या विद्युत टाॅवरमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि मूल्यांकन होऊन अनेक महिने उलटूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने बदनापूर तालुक्यातील अकोला- निकलक, गोकुळवाडी गावातील शेतकऱ्यांनी विद्युत टॉवरवर चढून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन केले. या शेतकऱ्यांच्या शेतात एक वर्षा पुर्वी पॉवरग्रीड कापोर्रेशन ऑफ इंडिया लि. या कंपनीच्या वतीने ७६५ के.व्हि वर्धा- औरंगाबाद ही लाईन चे टॉवर उभारण्यात आले आहे.
या टॉवरलाईनमुळे बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक, गोकुळवाडी शिवारातील पिकांसह मोसंबी,डाळींब,सीताफळ ,पेरू,शेवगा,चिंच,आंब ्याच्या बागेचे ही मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीचे पंचनामे आणि मूल्यांकन ही कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. पंचनामे होऊन अनेक वर्ष उलटूनही कंपनी प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. वारंवार पत्र व्यवहार करूनही कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने नुकसान भरपाई तात्काळ द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बुधवारी शोले स्टाइल आंदोलन केले. तत्काळ मोबदला न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही या आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.