आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:बिलावरून शेतकऱ्यांची वीज तोडता येणार नाही ; माजी आमदार अ‍ॅड. खरातांच्या प्रयत्नांना यश

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज बिलाच्या मुद्द्यावरून यापुढे शेतकऱ्यांच्या शेतीची वीज महावितरण कंपनीला तोडता येणार नाही, शेतकऱ्यांंच्या या समस्येवर राज्य अन्न आयोगाने मोठा दिलासा देतानाच महावितरण कंपनीला सूचनावजा आदेशच दिला आहे. शेतकऱ्यांंच्या शेतातील वीज कापल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत येत असे. ज्यावेळी त्याला विजेची खरी गरज आहे त्याच वेळी महावितरण कंपनी वीज बिलाच्या मुद्यावरून शेतातील वीज कापत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे हा मुद्दा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आ. अ‍ॅड. विलास खरात यांनी गेली काही दिवसांपासून लावून धरला होता.

सातत्याने महावितरण कंपनीला पत्रव्यवहार करूनही फारसा फायदा होत नाही, हे लक्षात येताच अ‍ॅड. खरात यांनी औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ अजय तल्हार यांच्या मार्फत या संदर्भात एक याचिका दाखल केली होती. राज्य आयोग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत ही याचिका महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केल्यानंतर सर्व बाबींचा सखोल विचार करून राज्य अन्न सुरक्षा आयोगाने महावितरण कंपनीला एक सूचना वजा आदेश देऊन यापुढे शेतकऱ्यांची वीज बिलाच्या मुद्यावरुन शेतीची वीज कापता येणार नाही, असा आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जातो.

खऱ्या अर्थाने शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याने शेतात अन्नधान्य पिकवलं नाही तर आपण काय खाणार अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती करण्यासाठी योग्य पाणी पुरवठा आणि वीजेचा पुरवठा व्हायलाच हवा, आणि तो त्याचा मुलभूत अधिकार आहे, असे स्पष्ट केले. सदरील याचिकेत अ‍ॅड. खरात यांनी विद्युत अधिनियम २००३ चे कलम ६५ चा दाखला दिला आहे. दरम्यान अॅड. विलास खरात यांच्या प्रयत्नाला मोठे यश आल्याचा दावा केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...