आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटचाल:स्वहक्कासाठी आता शेतकऱ्यांचा लढा; बळीपूजन करून बळीराजा फाउंडेशनचा वर्धापन दिन साजरा

फत्तेपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील बरांजळा लोखंडे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून बळीराजा फाऊंडेशन समाजिक संघटनेचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

बळीराजा फाऊंडेशन चे उपाध्यक्ष शंकर महाराज राऊत यांच्या हस्ते बळीपूजन करण्यात आले. बळीराजा फाऊंडेशन च्या माध्यमातून गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देणे, रखडलेले अनुदान वाटप करण्यास भाग पाडणे, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून वेळप्रसंगी आंदोलने करून न्याय मिळवून देणे, विद्यार्थ्यांसाठी बसेस चालू करणे, कोरोनाकाळात विधवा झालेल्या महिलांना शासकीय लाभ मिळवून देणे तसेच निधी मिळवून देणे, वृक्षलागवड तसेच संगोपन करणे, विविध आरोग्य शिबीर आयोजित करणे, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करून आणणे असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

कामगार दिनाचे औचित्य साधुन मागिल वर्षी शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन बळीराजा फाऊंडेशन सामाजिक संघटनेची स्थापना केली होती. त्या निमित्ताने बळीपूजन करुन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी बळीराजा फाऊंडेशन चे अध्यक्ष नारायण लोखंडे, उपाध्यक्ष शंकर महाराज राऊत, सचिव अनिल भुतेकर, कोषाध्यक्ष संदीप भोकरे, नारायण बकाल, अनिल साबळे, अमोल खांडवे, रामप्रसाद लोखंडे, राहुल साबळे, गजानन लोखंडे, कृष्णा लोखंडे, गंगाधर दिवटे, समाधान साबळे, अजिनाथ लोखंडे, रवींद्र वाकोदकर आदींची उपस्थिती होती.

आगामी काळात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरि कामगारांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढा उभारणार असल्याचे बळीराज्याचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...