आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी:खरिपासाठी खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रात होतेय गर्दी; काळ्या आईची ओटी भरण्यासाठी जगाचा पोशिंदा सज्ज

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान खात्याने दहा जुननंतर पाऊस पडणार असल्याचे भाकीत दिले आहे.त्यामुळे शेतकरी दुष्काळाचे संकट बाजुला सावरून खिशात पैशाची कडकी असताना देखील काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या खरिपातील पेरणीची कामे पूर्णत्वाकडे असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खते व बी-बियाणे भरुन ठेवले आहे तर बरेच शेतकरी आता कृषी सेवा केंद्रात जाऊन खते, बी-बियाणे खरेदीसाठी गर्दी करु लागले आहे. भोकरदन तालुक्यात यंदा कृषी खात्याकडुन एक लाख नऊ हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या दिशेने कृषी विभागाकडुन उपाययोजना देखील करण्यात येत आहे. सध्या गावागावात शेतकऱ्यांना सोयाबीन प्रात्यक्षिककरण करुन मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे संपूर्ण खरिप हंगामावर अवलंबून आहे. शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मका, कपाशी, सोयाबीन, मिरची, तुर,उडीद-मुग आदी पिकाची लागवड करीत असतो. मागील वर्षी पर्जन्यमान अधीक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपात नुकसान झाले होते. त्यामुळे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवीला असल्याने शेतकरी वर्गात आंनदाचे वातावरण आहे. पेरणीच्या योग्य वेळीच पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले असल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील शेती मशागतीची कामे आटोपती केली आहे.

सध्या सगळीकडे शेतकरी शेती कामात व्यस्त आहे.दरम्यान पेरणीसाठी लागणाऱ्या बि-बियाणे खते, यासाठी शेतकरी पैशाची जुळवाजुळव करु लागले आहे. अनेक शेतकरी पिक कर्जासाठी बँकेचे उबंरठे झिजवत आहे.माञ बँकाकडून खरीप पेरणी तोंडावर आली असली तरी नवीन पिक कर्जासाठी हालचाली सुरू नसल्याचे जाणवत आहे. गतवर्षी खरिपात परतीच्या पावसाने घात केल्याने शेतीसाठी लावलेला खर्च देखील निघाला नाही. यातच रब्बीत देखील शेती मालाला बाजारपेठत भाव मिळाला नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. मागील वर्षी निसर्गाने साथ दिल्याने पिके देखील जोमात होती.माञ ऐन सोंगणीच्या काळात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवीला.खरिपातील झालेले नुकसान शेतकऱ्यांनी रब्बीतुन भरुन काढु अशी अपेक्षा ठेवली माञ रब्बीला देखील बदलत्या वातावरणाचा फटका बसला. सध्या पावसाचे दिवस डोक्यावर आले असल्याने फक्त शेती तयार करुन पेरणी करायची ऐवढेच शेतकऱ्यांच्या लक्षात असुन शेतकरी रखरखत्या उन्हात देखील शेती कामे उरकून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

दोन वर्षापासून कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना परेशान करुन सोडले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक चणचणीत आहे.अशा परिस्थितीत देखील आपली उमेद कायम ठेवत काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली खरिप पेरणी जवळ आल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. शासनाने खरिप पेरणीसाठी मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

विविध नामांकित कंपन्याचे वाण विक्रीसाठी दाखल
मागील दोन ते तीन दिवसांपासून शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदी करण्यासाठी दुकानात प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध नामांकित कंपन्यांचे वाण दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
सुभाष देशमुख, राजेंद्र कृषी सेवा केंद्र, पिंपळगाव रेणुकाई.

बातम्या आणखी आहेत...