आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेंभुर्णी:शेतकरी शेतीच्या कामात गुंतल्याने आठवडी बाजारातील ग्राहकांची गर्दी ओसरली

टेंभुर्णीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी शेती कामामध्ये व्यस्त असल्याने सद्यस्थितीत ग्रामीण भागातील आठवडी बाजार ग्राहक अभावी ओस पडत आहे. सोमवारच्या येथील आठवडी बाजारात भाजीपाला ही कमी प्रमाणात आला होता तर ग्राहकी ही मंदावली होती.

दरम्यान, कमी भाजीपाला आल्याने भाजीपाल्याचे दर वधारले होते परिसरात मागील आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकरी शेती कामात व्यस्त झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून बाजारामध्ये येण्याचे टाळले जात आहे. संपूर्ण कुटुंब शेतात काम करीत असल्याने आठवडी बाजारात ग्रामीण भागातील ग्रामस्थ येत नसल्याचे व्यापारी सुभाष तांबेकर यांनी सांगितले. सोमवारी गोबी, कारले, दोडके, शेवगा शेंग शंभर रुपये किलोप्रमाणे विकले गेले. सर्वच भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सद्यस्थिती शेतकऱ्यांकडून खरिपातील पिकांची लागवड चालू असल्याने भाजीपाला व इतर पिके विक्रीसाठी येत नाही परिणामी भाजीपाल्याची आवक घटली आहे.

आवक नसल्याने भाजीपाल्याचे भाववाढ झाली उन्हाळा पेक्षाही सद्यस्थितीत भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले आहेत शेतकरीच बाजारात नसल्याने बाजारपेठही मंदावली आहे. दरम्यान, आठवडी बाजारात माल नेण्यासाठी वेळ नाही याशिवाय उन्हाळी भाजीपाला पिके मोडीत काढून या ठिकाणी खरीप हंगामाची पिके लावण्याची लगबग शेतात सुरू आहे. यामुळे होणारा उन्हाळाभर भाजीपाला पिके घेतल्यानंतर आता खरीपातील कपाशी सोयाबीन मका या पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याकरता कल कमी झाला असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकरी विष्णू जोशी यांनी सांगितले.