आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलत्या हवामानामुळे शेतकरी पिकांना संरक्षण मिळावे म्हणुन पिकविमा भरतात. पिंपळगाव रेणुकाई येथील महिला शेतकरी रंजनाबाई मयुरे यांनी खरीपात दहा हजार रूपये भरलेले असताना त्यांच्या खात्यात केवळ विम्याचे एक हजार रुपये जमा झाले. ही एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा असुन विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची होत असलेल्या फसवणूकीवर जिल्हाधिकारी डाँ. विजय राठोड यांनी लक्ष देण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यंदा ६२ हजार ९४४ हेक्टरसाठी १ लाख ६९ हजार ४८६ अर्ज विमा कंपनीकडे आँनलाईन अर्ज शेतकऱ्यांनी प्रस्तावीत केले आहे. यावर्षी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पैशाची तडजोड करीत विमा कंपनीकडे खरीप पिकाचा विमा उतरला होता. पिके ऐन हातात येण्याच्या परिस्थितीत असताना परतीच्या पावसाने घोळ घातल्याने हजारो हेक्टरवरील पिके बाधीत झाली. नुकसान झालेल्या पिंकाचे शासन आदेशानुसार प्रशासनाकडून पंचनामे देखील करण्यात आले. शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुसतीच मदत जाहीर केली.
मातर अद्याप ती मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यात दुसरीकडे विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात मनमानीपणाने विमा रक्कम अदा करण्यास सुरूवात केली. ज्या शेतकऱ्यांनी दहा हजार भरले असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ एक हजार रुपये टाकण्याचा प्रताप विमा कंपनीकडुन करण्यात आला. असे किती तरी शेतकरी या प्रकाराचे बळी झाले आहे.
अगोदरच शेतकरी नैसर्गिक संकटामुळे हतबल झाले आहे. त्यात दुसरीकडे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची होणारी लूट पाहता शेतकरी दरवर्षी आर्थिक कंगाल होऊ लागले आहे. सध्या शेत परिसरात रब्बी पेरणीची लगबग सुरू आहे. खरिपातील नुकसानीमुळे शेतकऱ्यांजवळ पैशाची कडकी आहे. शासन देखील तत्काळ मदत देण्यास उदासीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकारी कर्ज काढून रब्बी पेरणी पूर्ण करावी लागत आहे. यंदा शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या पावत्या घेऊन ७२ तासाच्या आता रितसर तक्रारी केलेल्या आहेत. परंतु तक्रारी करुन देखील बरेच शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नसल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. याबाबत विमा प्रतिनिधीनां विचारणा केली तर त्यांच्याकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळतात. कृषी खात्याला विचारले तर ते विमा कंपनीकडे बोट दाखवून मोकळे होतात.
हे तर विमा कंपनीचे नित्याचेच
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे खरिपात दरवर्षी मोठे नुकसान होत आहे.नुकसान भरपाई मिळावी म्हणून भोकरदन तालुक्यातील शेतकरी दरवर्षी कोट्यावधी रुपये विमा भरणा करीत आहे. मात्र त्याबदल्यात शेतकऱ्यांना पिंकाचे नुकसान होऊनही केवळ मानसिक ञास देण्याचं काम विमा कंपनीकडून सातत्याने होत आहे.यंदा देखील तीच परिस्थिती कायम आहे.अनेक शेतकऱ्यांना विमा मिळाला असला तरी तो भरणा केलेल्या रक्कमेच्या अर्धा देखील नाही.त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.विमा भरावा म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करणारे शासन आणि कृषी खाते याबाबत “ब्र” शब्द काढण्यास तयार नसल्याने नवल वाटत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.