आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी संस्कृती:कॅन्सर टाळण्यासाठी गो आधारित कृषी संस्कृती शेतकऱ्यांनी टिकवण्याची गरज ; गोसंवर्धन अभ्यासक विजय वरुडकर यांचे प्रतिपादन

श्रीक्षेत्र राजूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कँन्सर, मधुमेह, रक्तदाब, ह्रद्यविकार ही आजार जर येणाऱ्या पिढीत टाळायची असेल तर शेतकऱ्यांनी गोआधारीत कृषी संस्कृती टिकवण्याच व जतन करण्याचे काम करावे, असे आवाहन गो संवर्धन अभ्यासक विजय वरुडकर यांनी केले. राजूर येथे सोशल रिस्पोन्सिब्लीटी समुह, गोसंवर्धन महासंघ व तेजस जनविकास संस्थेच्या वतीने रसायनमुक्त शेती कँन्सरमुक्त निरोगी भारत या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी सरपंच भाऊसाहेब भुजंग, चनेगांव सरपंच निवृत्ती शेवाळे, उपसरपंच दौलतराव निहाळ, सामाजिक कार्यकर्ते गजानन सानप, गोसंवर्धन महासंघ संचालक परमेश्वर स्वामी, ध्रुती फाउंडेशन मुंबईचे गोपाल देवकर, तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे, ज्ञानेश्वर पालकर, मिरा शेरे, वैशाली अंबिलवादे, मिरा पुंगळे, तैय्यदा शहा आदी उपस्थित होते. वरुडकर म्हणाले, खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदु ही गाय असुन गायीच्या शेनापासुन, गोमुत्रापासुन शेतीसाठी शेतकऱ्यांनी वज्रमुठ बांधावी तरच बळीराज्याचं राष्ट्र समृद्ध संपन्न होईल. शेती उत्पादन वरील वाढता खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती हाच उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या शेतीत रसायनमुक्त परसबाग, फळबाग तयार करावी गाय आधारीत सेंद्रीय शेतीकडे शेतकरी वळाल्यास वाढत्या रोगांवर नियंत्रण आणता येईल. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात उद्योग, लघुउद्योग उभे रहावेत यामुळे रोजगार मिळुन गावाचा विकास शक्य आहे. स्वावलंबी गांव, विषमुक्त अन्न ही संकल्पना प्रत्येकाने अवलंबावी तसेच गुळवेल, कोरफड, तुळस, आद्रक, गवतीचहा, गव्हांकुर यासांरख्या आयुर्वेद वनस्पतींची माहिती घेऊन यांची लागवड सुद्धा शेतकऱ्यांनी करावी जेणे करून शेतकरी कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील. देशी गायीचे शेण, गोमुत्र यामुळे जमीनीची पोत सुधारते, गाय कत्तलखान्यात न पाठवता प्रत्येक शेतकऱ्यांनी गायीचं पालन पोषन करावे. गावं तेथे गोशाळा ही संकल्पना गांवकऱ्यांनी जोपासावी असेही ते म्हणाले. या वेळी परमेश्वर स्वामी यांनी गो कृपाअमृत वापरून शेती उत्पादन वरचा खर्च कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच गाय आधारित विविध उद्योग व शासकीय योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक शिवाजी तायडे यांनी तर बी. एस. सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनराज घुगे, बाबासाहेब घुगे, कडुबा तायडे, शालीक तायडे, श्रीमंत ढवळे, राजेंद्र जगदाळे, भगवान घुगे, शंकर फुके, तेजस तायडे यांनी परिश्रम घेतले.