आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकार एकीकडे आपले लोक आणि सरकार वाचवण्यात व्यस्त आहे. मात्र, शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. रब्बीतील सर्वच पिकांना बेमोसमी पावसाचा फटका बसला आहे. या नुकसानीचा महसुली यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी विधिमंडळात करणार असल्याचे विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. शनिवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी श्रीकृष्णा शेळके यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, तालुकाप्रमुख अशोक पाटील बर्डे, अशोकराव शिंदे, तालुका संघटक नंदकिशोर दाभाडे, पद्माकर पडूळ, युवासेना उपजिल्हाप्रमुख बळीराम मोरे, उपसभापती रवी बोचरे, तहसीलदार सुमन मोरे, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, मंडळ अधिकारी तलाठी सुनील होळकर यांच्यासह गणेशराव शिरसाट दत्तू ननवरे, सुभाष अडसूळ, हरिभाऊ नाईकवाडे, संभाजी सोनवणे, अर्जुन मोरे, ताराचंद फुलमाळी, कैलास दाभाडे, गणेश शेळके, शहाजी शेळके आदी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.