आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:महावितरणच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी त्रस्त ; दुरुस्तीसाठी मारताहेत चकरा

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी येथील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे घरगुती व शेतकरी ग्राहक त्रस्त झाले आहे. गावठाणचे तीन तसेच शेतीचे पाच रोहित्र जळाल्याने आष्टीतील अर्धे गाव तसेच शेतकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी महावितरण कंपनीने तातडीने लक्ष देत रोहित्राची समस्या सोडवावी अशी मागणी आष्टीकरांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.

आष्टी हे तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे गेल्या पंधरा दिवसांपासून एक तर चार दिवसांपासून दोन त्यात एक ३.१५ केव्ही असे तीन ट्रान्सफाॅर्मर जळाल्याने अर्धे गाव गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहे. मागील दोन वर्षांपासून गावातील जुनाट झालेल्या तारा तुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्या बदलण्यात याव्यात. तसेच गावातील अवैध विद्युत चोरी करणाऱ्या आकडे बहादुरांवर कार्यवाही करण्याची मागणी महावितरणच्या ग्राहकांकडुन केली जात आहे. मात्र, महावितरण कंपनीकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अवैध तारावरील आकड्यांमुळे तारा तुटण्याचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप केला जात आहे.

तसेच परिसरातील भगवान नगर, गवळी, देवळे येथील शेतीचे पण काही चार तर काही तीन महिन्यांपासून अशी तब्बल पाच रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पेरण्या लांबलेल्या आहे. यावर्षीच्या परतीच्या पावसात झालेल्या अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोडाशी आलेली पिकें डोळ्यांदेखत होतीची नाहिशी झाली होती. यातून सावरत शेतकरी रब्बी पेरणी करित असताना महावितरण कंपनीकडून पांच जळालेली रोहित्र दुरुस्त करून देतं नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामात ही धोक्यात आला आहे. लवकरात लवकर रोहित्र न मिळाल्यास घरगुती व शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

रोहित्रांसाठी वरिष्ठांना मागणी
गावठाणातील दोन पेकी ३.१५ केव्ही चा एक ट्रान्सफार्मस उपलब्ध झालेला असून उर्वरित ट्रान्सफार्मसची वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे. दरम्यान, ग्राहकांनी पण आपल्याकडील विज बिलांची बाकी भरुन सहकार्य करण्याचे आवाहन आष्टी येथील सहायक अभियंता नामदेव केंद्रे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...