आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चार पाणीपाळ्या मिळणार

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निम्न दुधना प्रकल्पामध्ये यावर्षी १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे परभणी व जालना जिल्ह्याच्या लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांना रब्बी हंगामातील उभ्या पिकांसाठी कालव्याद्वारे ३ पाणीपाळीद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. या पाणीपाळीमध्ये डाव्या व उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात येणार आहे. तरी शेतकरी लाभधारकांना शक्य असेल तेथे प्रवाहाने अथवा उपसाद्वारे पाणी द्यावयाचे नियोजन आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज नमुना- ७ अ मध्ये पीकक्षेत्र नोंदवुन परिपुर्ण अर्ज तातडीने कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा विभाग १० अंतर्गत संबंधित उपविभागात सादर करावेत, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा विभाग क्र.१० परभणी यांनी केले आहे.

पाणी अर्ज संबंधीत उपविभागात विनामुल्य उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी प्राप्त झालेल्या पाणी अर्जास नियमाच्या अधीन राहून मंजुरी देण्यात येईल. तत्कालीन परिस्थितीनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार कार्यकारी अभियंता यांना असतील. प्रथम पाणीपाळी १७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत, द्वितीय पाणीपाळी १५ ते २८ डिसेंबर, तृतीय पाणीपाळी १२ ते २५ जानेवारी २०२३ आणि चौथी पाणीपाळी ९ ते २२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत प्रस्तावित करण्यात आलेली आहे. पाणीपाळी कार्यक्रमानूसार शेतकरी लाभधारकांना चालू हंगामातील कालव्याचे पाणी घेतल्यास पिकांची पाणीपट्टी भरावी लागेल, पिकांचे मागणी क्षेत्र २० आरच्या पटीत असावे. मंजुर उपसा सिंचन योजना धारकांनी कालवा, नदी, नाले पाणी अर्ज मंजुर करून घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा. पाणी अर्जासोबत उपसा सिंचनाच्या परवानगीची प्रत जोडावी. जलाशय उपसा मंजूर उपसा सिंचन योजनांमधूनच करण्यात यावा. पाणीपट्टी न भरणाऱ्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही व त्यांचा पाणी पुरवठा केंव्हाही बंद करण्यात येईल.

शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार अनुज्ञेय कालावधी नंतरच्या विलंबाने केलेल्या अदायगी करिता आकारणी केलेल्या पाणी पट्टीवर अथवा त्याच्या हिश्श्यावर दरमहा एक टक्का दंडात्मक दर आकारला जाईल. निम्न दुधना प्रकल्पावर 4 सरंक्षणात्मक पाणीपाळी देण्याचे नियोजन असल्याने त्यावरील लाभधारकांनी त्यानुसार पिकांचे नियोजन करावे. निम्न दुधना प्रकल्पाअंतर्गत असलेल्या लाभधारकांनी याबाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...