आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:रखरखत्या उन्हात मशागतीसाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली...; भोकरदन तालुक्यात एक लाख हेक्टरवर होणार खरीप पेरणी

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा हवामान खात्याने पावसाळा सुरू होण्याच्या दहा दिवस अगोदरच वरुणराजा हजेरी लावणार असल्याचे भाकीत केले आहे.त्यामुळे शेतकरी सततच्या दुष्काळाचे संकट बाजुला सावरून शेती कामासाठी मागील महिनाभरापासुन व्यस्त आहे. सध्या रखरखत्या उन्हात खरिपातील पेरणीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असुन शेतकऱ्यांचे लक्ष जुन महिन्यातील पावसाकडे लागून आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खते व बि-बियाणे भरुन ठेवले आहे. तर अनेक शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटलेली असल्यामुळे पेरणी करताना शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागणार असल्याचे चिञ आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोफत-बियाणे वाटप करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

भोकरदन तालुक्यात यंदा कृषी खात्याकडुन एक लाख नऊ हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या दिशेने कृषी विभागाकडुन उपाययोजना देखील करण्यात येत आहे. सध्या गावागावात शेतकऱ्यांना सोयाबीन प्रात्यक्षिककरण करुन मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे संपूर्ण खरिप हंगामावर अवलंबून आहे. शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मका, कपाशी, सोयाबीन, मिरची, तुर, उडीद-मुग आदी पिकाची लागवड करीत असतो.मागील वर्षी पर्जन्यमान अधीक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपात नुकसान झाले होते.

त्यामुळे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पेरणीच्या योग्य वेळीच पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले असल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील शेती मशागतीच्या कामास वेग दिला आहे. सध्या सगळीकडे शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. तसेच मुलांना देखील शांळाना सुट्या असल्याने शेतकरी मुलाबाळासह सकाळपासूनच नांगरणी, वेचणी, वखरणी, सरी, फुलीचे आदी कामे करण्यावर भर देत खरीप पेरणीसाठी शेती तयार करुन ठेवत आहे.

दरम्यान पेरणीसाठी लागणाऱ्या बि-बियाणे खते, यासाठी शेतकरी पैशाची जुळवाजुळव करु लागले आहेत. अनेक शेतकरी पिक कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. माञ बँकाकडून खरीप पेरणी तोंडावर आली असली तरी पिक कर्जासाठी हालचाली सुरू नसल्याचे जाणवत आहे. गतवर्षी खरिपात परतीच्या पावसाने घात केल्याने शेतीसाठी लावलेला खर्च देखील निघाला नाही.

यातच रब्बीत देखील शेती मालाला बाजारपेठत भाव मिळाला नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. मागील वर्षी निसर्गाने साथ दिल्याने पिके देखील जोमात होती. माञ ऐन सोंगणीच्या काळात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. खरिपातील झालेले नुकसान शेतकऱ्यांनी रब्बीतुन भरुन काढु अशी अपेक्षा ठेवली माञ रब्बीला देखील बदलत्या वातावरणाचा फटका बसला. सध्या पावसाचे दिवस डोक्यावर आले असल्याने फक्त शेती तयार करुन पेरणी करायची ऐवढेच शेतकऱ्यांच्या लक्षात असुन शेतकरी रखरखत्या उन्हात देखील शेती कामे उरकून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...