आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:टँकर बंदीसाठी पुणेगाव ग्रामपंचायतसमोर उपोषण

जालना19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळा संपल्यानंतर जून महिन्यात पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाने सुरू केलेले टॅंकर बंद करावे या मागणीकरिता जालना तालुक्यातील पुणेगाव येथील कारभारी अंभोरे यांनी चार दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश चितळकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दर्शवला.

पुणेगाव येथे ग्रामस्थांना पाणी पुरवठ्यासाठी चार विहिरी असून विहिरींत मुबलक पाणीसाठा असतानाही तहसीलदारांच्या शिफारशी वरून जालना उपविभागीय अधिकारी कार्यालयाने १ जून रोजी खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा मंजुरीस मान्यता दिली. राहुरी जि. अहमदनगर येथील निविदा धारकास बारा हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरद्वारे गावात दररोज दोन खेपा पाणीपुरवठा करावा, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्यावर नियंत्रण ठेवावे ,असे मंजुरी आदेशात नमूद करण्यात आले. भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने सुरु केलेले टॅंकर बंद करावे नसता आमरण उपोषण करण्याचा इशारा कारभारी अंभोरे यांनी २ जून रोजी जिल्हा प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे दिला होता. मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही.

त्यामुळे ६ जूनपासून अंभोरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान गुरुवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्याकिरिणी सदस्य ओमप्रकाश चितळकर यांनी पुणेगावची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली. यावेळी कारभारी अंभोरे, पुंजाराम खर्जुले, परमेश्वर करपे, हरिभाऊ करपे, उत्तमराव खंदारे, प्रभू दारकड, सिताराम अभोरे, गजानन चोरमारे, जनार्दन घुले, प्रदीप उगले, कैलास कोळेकर, अॅड. संभाजी चुनखडे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...