आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवानगी:ऑनर किलिंग प्रकरणामध्ये वडील अन् चुलत्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगी नात्यातील मुलासाेबत पळून गेल्यामुळे समाजात बदनामी झाली म्हणून वडील व चुलत्याने मुलीला लिंबाच्या झाडाला गळफास देऊन नंतर हत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे उघडकीस आली आहे. दरम्यान, संशयित आरोपी हे पोलिस कोठडीत होते. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सूर्यकला संतोष सरोदे (१७) असे मृत मुलीचे नाव आहे. तर संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. गळफास देऊन मुलीची हत्या करीत नंतर पुरावा राहू नये म्हणून अंत्यविधी सुध्दा करण्यात आला होता. परंतु, चंदनझिरा पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ जाऊन अंत्यविधीची राख, हाडे गोळा केली व चौकशी केली असता खुनाची कबुली संशयित आरोपींनी दिली. चंदनझिरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पिरपिंपळगावचा किचकट असलेला हा गुन्हा उघड झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पीएसआय गणेश झलवार हे करीत आहेत.

प्रियकराकडील व्हिडिओ जप्त
मृत मुलीचे वडील व चुलत्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच मुलीच्या प्रियकराकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. लग्न मोडल्याच्या ठिकाणाहून मुलीला दुचाकीवरून नातेवाईक घेऊन जात असतानाचे व्हिडीओ मिळाले आहेत. नातेवाइकांची अजून चौकशी सुरू आहे. - गणेश झलवार, पीएसआय, चंदनझिरा

बातम्या आणखी आहेत...