आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला झाडाला गळफास देऊन केली हत्या:जालन्यातील ऑनर किलिंग प्रकरणामध्ये वडील, चुलत्याला कोठडी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्यकला संतोष सरोदे  - Divya Marathi
सूर्यकला संतोष सरोदे 

मुलगी नात्यातील मुलासाेबत पळून गेल्यामुळे समाजात बदनामी झाली म्हणून वडील व चुलत्याने मुलीला लिंबाच्या झाडाला गळफास देऊन नंतर हत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे उघडकीस आली आहे.

दरम्यान, संशयित आरोपी पोलिस कोठडीत होते. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सूर्यकला संतोष सरोदे (१७) असे मृत मुलीचे नाव आहे, तर संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. गळफास देऊन मुलीची हत्या करीत नंतर पुरावा राहू नये म्हणून अंत्यविधीही करण्यात आला होता. परंतु, चंदनझिरा पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ जाऊन अंत्यविधीची राख, हाडे गोळा केली व चौकशी केली असता खुनाची कबुली संशयित आरोपींनी दिली. चंदनझिरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पीरपिंपळगावचा किचकट असलेला हा गुन्हा उघड झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...