आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनी कपाशी:आंतरपिकात मेथी, कोथिंबीर बहरली

धावडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील धावडा महसुल मंडळातील वडोदतांगडा, सेलूद, भोरखेडा, धावडा, वालसावंगी परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी, मिरची पिक काढून रब्बी हंगामाच्या एक महीना अगोदरच लागवड केलेल्या मका पिकात अंतर पिक म्हणून मेथी व कोथंबिरची लागवड केली. ती आता बहरली आहे.

मेथी भाजी काढणीला परिसरात वेग आला असून परिसरातील शेतकरी व मेथी उत्पांदक शेतकरी यांच्याकडून मजुर लावून मेथी भाजी काढून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सुरवातीला स्थानिक भाजीमंडीत २० रूपये जुडी प्रमाणे भाझी विकल्या गेली कोथंबिर 100 रुपये किलोपर्यंत गेली होती. परंतु आता सर्वच शेतकऱ्यांचा भाजीपाला आठवडे बाजारात व मार्केटातील लिलावात ३० ते ३५ रूपये प्रति किलो हमी भाव मिळत असल्याने व १० रुपये जुडी, २० रुपयांत तीन जुडी विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मेथी पिक दीड महिन्याच्या कालावधीत येणारे पीक असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांची ओढ ही भाजीपाल्याकडे दिसून येत आहे.

धावडा, वालसावंगी गाव हे जिल्ह्यात मेथी व कोथंबिर लागवडीसाठी प्रसिद्ध असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात मेथी, कोंथिबीर, गोबी पिकांची लागवड केली जाते. येथे मेंथी विकत घेवून मार्केटात पाठवणारे व्यापारी यांची संख्या जास्त असल्याने येथून जवळपास दहा-बारा चार चाकी वाहने अकोला, अमरावती, मुंबई वाशी, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, नागपूर आदी ठिकाणी दररोज पाठवली जात असल्याने धावडा व वालसावंगी येथील २०० मजूरांना मजुरी मिळत आहे. मजूर मेथी उपटून झुडी बांधण्याचे ३०० रूपये रोज कमवित आहेत. सध्या धावडा, वालसावंगी, पारध, पिंपळगाव रेणुकाई, शेलूद, पोखरी, वडोदतांगडा, अान्वा, जळगाव सपकाळ परिसरात प्रमाणात मका पिकांत लागवड केलेल्या मेथी भाजी काढणीचे कामास वेग आला आहे.

बातम्या आणखी आहेत...