आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलपोळा:बैलपोळ्याचा सण कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतीक : हरिभाऊ चौधरी

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैलपोळा हा सण कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन हरिभाऊ चौधरी यांनी केले. सेलू शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात बैलपोळा व मातृदिनानिमित्त मातीचे बैल तयार करणे ही स्पर्धा व त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, प्रभारी मुख्याध्यापक विनोद मंडलिक यांची उपस्थिती होती. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे चौधरी यांनी सांगितले. प्रारंभी आयुषा काळे, ईश्वरी काळे यांनी स्वागत गीत गायले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी, तर अनिल कौसडीकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर राऊत,अभिषेक राजूरकर, रागिणी जकाते, दीपाली पवार, काशीनाथ पांचाळ, शारदा पुरी, स्वप्नाली देवडे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...