आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिबिरात कमी रुग्ण, गर्दीसाठी आणले कर्मचारी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात आयोजित माेफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन रविवारी दुपारी १ वाजेदरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते झाले. मात्र, या शिबिराला बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण अाल्याने मंत्री दानवे यांनी सिव्हिल सर्जन व डीएचओंना चांगलेच फैलावर घेतले. प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याने किमान १० लोकांना आणले असते तर येथे बसायला जागा राहिली नसती, असे म्हणत जिल्हा रुग्णालयात प्रत्येक रुग्णाला यावेसे वाटेल अशाप्रकारे सेवा द्या, शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा अशी कडक सूचनाही त्यांनी केली.

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिरात खुद्द सावे तसेच प्रमुख अतिथी असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश राठोड, आमदार राजेश टोपे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे अनुपस्थित होते, यामुळे मंत्री दानवे यांनाच उद्घाटक व अध्यक्षस्थान भूषवावे लागले. तर एकमेव आमदार कैलास गोरंट्याल उपस्थित राहिल्यामुळे प्रमुख अतिथी म्हणून त्यांना बोलण्याची संधी मिळाली.

जो आजारी आहे त्याला सण-उत्सव लागत नाही, त्याला उपचार हवे रुग्णांसाठी आयोजित शिबिरात ५० रुग्णही आले नाही, याबद्दल विचारणा केल्यावर जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सरकारी पद्धतीने सातव्या माळेचे कारण दिले. मात्र, जो आजारी आहे त्याला सण-उत्सव काहीच लागत नाही, त्याला उपचार हवे असतात. त्यातही माेफत शिबिर असेल अधिकाधिक रुग्ण लाभ घेतात, असे सांगत शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पाेहोचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची सूचना मंत्री दानवे यांनी केली.

बैठक बोलावण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसह विविध आरोग्य योजनांची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना बैठक बोलाण्याची सूचना मंत्री दानवेंनी केली. तसेच यात सिव्हिल सर्जन, डीएचओंनाही सहभागी करून घ्या, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...